सहज सोपे उपक्रम
शालेय वस्तू भांडार
आपल्या शाळेतील मुलांसाठी वही ,पेन , पेन्सील ,कंपासपेटीतील साहित्य ,खोडरबर साहित्य आपण विकत आणून ठेवू शकतो .टे साहित्य मुलांना माफक दरात म्हणजे न नफा न तोटा या तत्वावर विकत देवू शकतो . या उपक्रमात मुलेच नियंत्रण ठेवतील त्याचा जमा खर्च मुलेच पाहतील .याच फायदा असा होईल की मुलांना अल्प दरात शालेय
माझी बँक
विद्यार्थ्यांना पालक खाऊसाठी काही पैसे देत असतात किंवा काही भागात विद्यार्थी शाळा सुटल्यावर काही कामे करतात . उदा . कापूस वेचणी ,बोर वेचणी,इ . तसेच कोणी पाहुणे मंडळी आल्यास तेही मुलांना थोडेसे पैसे देतात .असे पैसे आपण जर विद्यार्थ्यांची बँक बनवून त्यात ठेवले तर मुलांना योग्य वेळी ते पैसे करता येतील . शालेय साहित्य खरेदी करता येईल . त्यासठी स्वतंत्र रजिष्टर करून त्यात मुलांची खाती काढता येतील . शक्य झाल्यास त्यांना पासबुक ची पण व्यवस्था करता येईल. व्यक्तिपरत्वे या उपक्रमात बदल करता येईल. व मुलांना बचतीची सवय तसेच बँकेचे कामकाज समजावून देत येईल .साहित्य मि
जो दिनांक तो पाढा
मित्रांनो विद्यार्थ्यांना पाढे पाठ असणे फार महत्वाचे असते .विद्यार्थ्यांना पाढे पाठ करणे अवघड जात असेल तर जो दिनांक असेल तो पाढा त्या दिवशीच्या परिपाठ मध्ये सामाविष्ट करावा व तो पाढा सर्वाना पाठ करून यायला सांगावे .जेणे करून एका महिन्यात ३० पर्यंत पाढे पाठहोतील . पुढच्या महिन्यात त्या पाढ्यांची परत उजळणी होईल