असा असावा आदर्श परिपाठ
शालेय परिपाठ-प्राथमिक शाळेतील इ.१ ली ते इ.८ वी च्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक दिवशी ५-६ विद्यार्थ्यांचे मुले मुली समान घेऊन इयत्तेनुसार गट पाडावेत. त्यातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे परिपाठातील विशिष्ट घटकांची जबाबदारी सोपवावी. आठवड्यातील ६ वार वर्गवार विभागून द्यावेत.उदा. सोमवार-८वीमंगळवार-७वी असे...पुढील प्रमाणे परिपाठ घेण्याचा प्रयत्न करावा.१.सावधान- विश्राम आदेशसंचालन करणा-या विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांना सूचना कराव्यात.२.राष्ट्रगीतसावधान स्थितीमध्ये ५२ सेकंदात राष्ट्रगीत कसे म्हणता येईल असा प्रयत्न करावा.३.प्रतिज्ञाआठवड्यात ६ दिवस शाळा भरते. एक दिवस मराठी भाषेत दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेत व तिस-या दिवशी इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा म्हणावी व पुन्हा उरलेल्या ३ दिवसात मराठी , हिंदी, इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा घ्यावी. किंवा सलग दोन दिवस एका भाषेतूनही सादर करता येईल.(विद्यार्थ्यांचा स्तर पाहून बदल करता येईल.उदा-७वी-८वी-इंग्रजी, ५वी-६वी-हिंदी, ३री-४थी-मराठी)४.भारताचे संविधानपरिपाठातील एका विद्यार्थ्याला पुढे संविधान म्हणण्यास सांगणे व बाकीचे विद्यार्थी मागे म्हणतील. याही ठिकाणी शक्य असल्यास इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतून संविधान घेता येईल.५.प्रार्थना व श्लोकठरलेल्या ६ वारांनुसार विद्यार्थ्यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सांगावे. प्रार्थना या विशिष्ट धर्माच्या असू नयेत, ज्यातून मानवता, दया, त्याग अशा गुणांची रुजवण होईल अशा असाव्यात.६.पंचांगकेव्हा दिवस उगवतो केव्हा दिवस मावळतो, कोणता वार आणि कोणती तारीख आहे.७.सुविचारसुविचार म्हणजे सुंदर असे विचार. एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट कतो म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे--संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.८.दिनविशेषउगवणाऱ्या प्रत्येक दिवशी काही न काही घटना घडून गेलेली असते आणि त्या उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व असत आणि म्हणून घडून गेलेल्या घटनांना उजाळा देण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आहे --- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.८.आजची म्हण व वाक्यप्रचारम्हणीमध्ये कमी शब्दात जास्त अर्थ लपलेला असतो, म्हणून आजची म्हण घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.त्यानंतर एक वाक्प्रचार अर्थासह सांगावा व त्याचा वाक्यात उपयोग करुन दाखविण्याची संधी समोर उपस्थित विद्यार्थ्यांना द्यावी.९.बातमीपत्रजगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही घडत असते तेच आपल्याला प्रसारमाध्यमांद्वारे समजत असते. म्हणून आजच बातमीपत्र घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.१०.समूहगीत/देशभक्तीपर गीतआठवड्यातील ६ दिवस वेगवेगळी गीते घ्यावीत. त्यात एखादे स्फुर्तीगीतही असावे. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून समुहगीत/देशभक्तीपर गीत गायन करावे.११.बोधकथाआजची बोधकथा घेऊन येत आहे--- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.१२.प्रश्नमंजुषाआजची प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे--संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.( सोपे ५ सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारावे.ज्या वर्गाचा परिपाठ असेल त्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न विचारले तर चांगले.)१३.वैज्ञानिक दृष्टिकोनसमाजात अनेक समज-गैरसमज असतात. त्यामूळे अंधश्रद्धा पसरतात, म्हणून घटनांचे वैज्ञानिक कारण स्पष्ट करावे.(शिक्षकांनी मार्गदर्शन केले तरी चालेल.)१४.इंग्रजी शब्दार्थ
आजचे इंग्रजी शब्दार्थ घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.( सोपे ५ इंग्रजी शब्दार्थ विद्यार्थांना विचारावेत.)१५.दिनांक तो पाढेगणिता सारखा अवघड विषय पाढ्यावर आधारलेला विषय आहे. गणितामध्ये पदोपदी पाढ्यांची गरज भासते. तेव्हा पाढे पाठांतर असणे गरजेचे आहे. म्हणून आजचा पाढा घेऊन येत आहे--- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.( प्रतिदिन २ ते ३१ पर्यंत पाढे पाठांतर करण्यास सांगावेत.)१६. आजचे वाढदिवसस्वतःचा जन्मदिवस स्वतःसाठी खिस असतो. तर असे आजचा दिवस खास बनवणारे आहेत---वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थी/शिक्षकांचे नाव घ्यावे व फुल किंवा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे.१७.पसायदानबैठे सावधान अवस्थेमध्ये पाठीचा कणा ताठ, हात गुडघ्यांवर सरळ ठेऊन दोन्ही डोळे मिटवून व सरळ बसुन समूहाने पसायदान घ्यावे.१८.मौन२ मिनिटे शांत अवस्थेत डोळे मिटून मौन धरावे.१९.विसर्जनविद्यार्थ्यांनी तीन टाळ्या वाजवाव्या व आपापल्या वर्गात रांगेत जावे.
MP3 परीपाठा साठी खालील इतर ब्लॉगची LINK देत आहे
शालेय परिपाठ (संगीतमय)
| |||
शालेय परिपाठ ( मराठी )
| |||
शालेय परिपाठ ( हिंदी )
| |||
शालेय परिपाठ ( English )
| |||
शालेय परिपाठासाठी आवश्यक साहित्य
| |||
सुवचन
| |||
कहावते
|
Idioms
| ||
हिंदी बोधकथा
|
Moral Stories
| ||
प्रार्थना
|
देशभक्ती गीत
|
Praye
|